Anil Deshmukh । मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अर्ज सीबीआय (CBI) कोर्टाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता अनिल देशमुख यांची दिवाळी यावेळीही तुरुंगातच जाणार आहे. 100 कोटींच्या खंडणीप्रकरणी अनिल देशमुख यांनी सीबीआय कोर्टात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र, याच प्रकरणात ईडी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला आहे. ईडीकडून जामीन मिळाल्यानंतर देशमुख यांनी सीबीआय कोर्टात जामिनासाठी अपीलही केले होते. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आज सीबीआय न्यायालयाने निकाल देताना अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एसएच ग्वालानी यांनी गुरुवारी जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. ईडीच्या प्रकरणात देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन कायम ठेवला आहे. मात्र, अद्याप सीबीआय प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला नसल्यामुळे त्यांचा मुक्काम कारागृहात होता. त्यामुळे त्यांनी सीबीआय प्रकरणात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र अनिल देशमुख यांचा हा अर्ज फेटाळण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. मुंबईतील मोठ-मोठे डान्स बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल केरण्याचे आदेश देशमुखांनी दिले असल्याचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग केला होता. याबाबतचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आलं होतं. राज्याच्या राजकारणात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. तर या प्रकरणामुळे विरोधकांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे देशमुखांनी त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
पुढे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. ईडीने अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला होता. देशमुख यांनी मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून सुमारे ४.७ कोटी रुपये गोळा केले. यासोबतच देशमुख यांनी चुकीच्या पद्धतीने कमावलेली रक्कम नागपुरातील श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक ट्रस्टला पुरवल्याचा आरोप ईडीने केला होता. या तपासादरम्यानच देशमुख यांना ईडीने नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | “लहान मुले चॉकलेटसाठी रडतात, तसे…”, रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा
- Viral Video | टीव्ही आणि कम्प्युटर पाण्याने धुणाऱ्या ‘या’ तरुणाचा व्हिडिओ झाला व्हायरल
- Pradeep kanase | सामाजिक गद्दारांना राजकीय गद्दार पाठीशी घालतोय, चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा – प्रदीप कणसे
- Aditya Thackeray | “गद्दारांचे नेते काहीतरी करण्याच्या मार्गावर असल्याचं कानावर होतं पण एवढं…”; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान
- Pravin Darekar | भास्करचा आता सुर्योदयाऐवजी सूर्यास्त जवळ आला – प्रवीण दरेकर