Kiran Kumar Bakale औरंगाबाद : जळगाव एलसीबीचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले (Suspended Police Inspector Kiran Kumar Bakale) यानी मराठा समाजाच्या महिलांच्या आंदोलनादरम्यान अत्यंत घाणेरडे वक्तव्य करून मराठा समाजाची बदनामी केली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. बकाले यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला होता. दरम्यान, किरण बकालेचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
मराठा समाजाबद्दल अश्लील वक्तव्य केल्यामुळे किरण बकालेचा आज २१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने ऐकले ते वादग्रस्त संभाषण-
निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व हजेरी मास्तर अशोक महाजन यांच्या संभाषणाची ती वादग्रस्त ऑडिओ क्लिप न्यायालयाने ऐकली. यामध्ये मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह्य वक्तव्य करण्यात आले होते. ज्यामुळे मराठा समाजाने आक्रमक होत किरणकुमार बकाले याच्यावर कारवाईची मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा”; भाजप नेत्यांचे कान टोचत रोहित पवारांची मागणी
- Diwali Special Offer | TVS च्या ‘या’ बाईकवर कंपनी देत आहे स्पेशल दिवाळी ऑफर
- Eknath Khadse | रश्मी शुक्लांना दिलासा मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,
- Diwali 2022 | धनत्रयोदशी दिवशी ‘या’ गोष्टी दिसल्या तर तुमच्या घरात येईल लक्ष्मी
- Rashmi Shukla । रश्मी शुक्ला यांना दिलासा! अवैध फोन टॅपिंग प्रकरणात राज्यसरकारचा मोठा निर्णय