मुस्लीमांच्या भावना दुखावल्या म्हणून विद्यार्थिनीला कुराण वाटपाचा न्यायालयाचा आदेश

रांची – रांची न्यायालयाने दिलेल्या विचित्र निर्णयाची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. रांची महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिचा भारती हिला जामीन मंजूर करण्यासाठी चक्क कुराणच्या ५ प्रतींचे वाटप मुस्लीम संस्थांमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या विद्यार्थिनीला समाज माध्यमांवर पोस्ट टाकून मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल अटक करण्यात आली होती. सिव्हिल कोर्टाचे मॅजिस्ट्रेट मनीष सिंह यांनी रिचा भारतील या प्रकरणी जामीन मंजूर केला. त्यासाठी तिला पिठोरिया पोलीस ठाण्याअंतर्गत अंजुमन इस्लामिया समिती येथे कुराणच्या ५ प्रतींचे वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत.