कुलभूषण जाधवांचा फैसला आज, न्यायालयाच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष

kulbhushan jadhav

टिम महाराष्ट्र देशा- माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय आज निकाल सुनावणार आहे. पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, या शिक्षेला भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं आहे.

या प्रकरणाची सुनावणी करताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच, आपला निर्णय राखून ठेवला होता. आज आंतरराष्ट्रीय न्यायालय आपला निकाल देणार आहे, या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान,या प्रकरणावरील सुनावणी अंतिम टप्प्यात झाली असून निकाल भारताच्या बाजूने लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.Loading…
Loading...