माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या तेलतुंबडेंना न्यायालयाचा दणका

मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना धक्का दिला आहे. कोरेगाव-भीमा हिंसेप्रकरणी नोंदवण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासाठी तेलतुंबडे यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली असून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी त्यांना तीन आठवड्याची मुदत दिली आहे.

पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र ‘मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही’, असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

पोलीस कार्यालय तोडफोड: भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांसह 119 जणांविरोधात आरोपपत्र

You might also like
Comments
Loading...