अधीक्षक कार्यालयातील निमतानदारास लाच घेताना अटक

टीम महाराष्ट्र देशा – इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदारास (तपासणी करणारा लिपीक दर्जाचा कर्मचारी) पंचवीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केले आहे.सतीश सोपान काटे (वय 47 रा. ओम कॉलनी क्रमांक 3, बिजलीनगर चिंचवड ) असे अटक आरोपीचे नाव आहे.इंदापुर तालुक्यातील पिंपळगाव येथील गट नंबर 6 मधील जमिनीची कोर्ट ऑर्डर प्रमाणे मोजणी करून त्याबाबतचा अहवाल कोर्टात सादर करण्याकरिता सतीश काटे यांनी तक्रारदाराकडून 50 हजारांची लाच मागितली होती. कसबा पेठ इंदापूर येथील साई अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये त्यापैकी २५ हजाराचा पहिला हप्ता घेताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे टीमचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके व उत्तरा जाधव यांनी केली