मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने काउंटी चॅम्पियनशीप सामन्यात शानदार सुरुवात केली आहे. त्याने दमदार गोलंदाजीच्या बळावर पदार्पणातच ५ बळी घेतले आहेत. सैनीला केंटने करारबद्ध केल्यानंतर बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे वॉरविकशायरविरुद्ध ५ बळी घेण्याची कामगिरी त्याने केली. अशा प्रकारे त्याने काउंटी क्रिकेटमध्ये येताच आपली छाप सोडली आहे. उजव्या हाताच्या या भारतीय वेगवान गोलंदाजाने ख्रिस बेंजामिन, डॅन मुस्ले, मायकेल बर्गेस, हेन्री ब्रूक्स आणि क्रेग माइल्स यांना बाद केले. त्यामुळे केंटने वॉरविकशायरला त्यांच्या पहिल्या डावात २२५ धावांत गुंडाळले होते. यानंतर केंटचा संघही मोठी धावसंख्या करू शकला नाही आणि १६५ धावांवर सर्वबाद झाला.
काउंटी चॅम्पियनशीपमध्ये सैनी (केंट), चेतेश्वर पुजारा (ससेक्स), उमेश यादव (मिडलसेक्स) आणि वॉशिंग्टन सुंदर (लँकेशायर) यांच्यासोबत खेळत आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्या लवकरच रॉयल वन डे चॅम्पियनशिपमध्ये वॉरविकशायरचे प्रतिनिधित्व करणार आहे. याआधी लँकेशायरकडून पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरनेही आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत ५ बळी घेतले होते. मात्र, उमेश यादवला काही विशेष कामगिरी करू शकला नाही. चेतेश्वर पुजाराही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.
Five wickets on debut: @navdeepsaini96 🏎 pic.twitter.com/6wzYjE8N1d
— Kent Cricket (@KentCricket) July 20, 2022
मिडलसेक्सविरुद्धच्या सामन्यात पुजाराने दमदार शतक झळकावले होते. त्याने या सामन्यात २३१ धावांची खेळी करून बाद झाला होता. महत्त्वाची बाब म्हणजे या सामन्यात पुजाराला कर्णधार बनवण्यात आले आहे. पुजाराने या मोसमात काउंटीमध्ये पाच शतके झळकावली आहेत. यामध्ये ३ वेळा तो द्विशतक करण्यात यशस्वी ठरला आहे. अशा स्थितीत पुजारा वेगळ्याच पातळीवरील क्रिकेट खेळत आहे, असे म्हणता येईल. भारतीय संघातून वगळल्यानंतर पुजारा काउंटीकडे वळला होता, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यानंतर त्याने तेथे काही शानदार शतके झळकावली आणि संघात पुनरागमन करण्यात तो यशस्वी ठरला. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतही पुजाराला खेळवण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Draupadi Murmu : मोठी बातमी : द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती, देशभरात जल्लोष
- ODI Cricket : वनडे क्रिकेटला हटवण्याबाबत वसीम अक्रमचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाला…!
- Praful Patel : राष्ट्रवादीला मोठा धक्का ! ईडीकडून प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त
- Sidhu Moosewala | “अब तेरा नंबर है बापू”; सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना मिळाली धमकी
- OBC reservation | ओबीसी आरक्षणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले..
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<