पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Co Operative Bank Election) मतमोजणीस आज सुरुवात झाली आहे. गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे २१ पैकी २१ जागा होत्या. गेल्या सात वर्षापासून जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. या सातही वर्षात अध्यक्षपद अजित पवारांकडेच होते. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रविवार दि. २ जानेवारीला या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. पुणे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत २१ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उरलेल्या सातपैकी हवेली तालुक्यातील एका जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत आहे, तर उरलेल्या सहा जागांवर कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांची राजकीय कारर्कीद याच जिल्हा बँक निवडणुकीपासून सुरु झाली होती. पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. १९९१ पासून अजित पवारांनी जिल्हा बॅंकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे ही निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
यांची झाली बिनविरोध निवड
भोरमधून प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी अ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील , ब वर्ग गटातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर अ वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘..तरी चीनचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांबरोबर फाफडा, ढोकळा खाताना दिसतील’, संजय राऊतांचा टोला
- …तर मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल- इकबाल चहल
- उन्मेष पाटील यांच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले,’हे तर चिल्लर…’
- प्रवीण दरेकरांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, चित्रा वाघ यांचा टोला
- अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रियाला कोरोनाची लागण
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<