विद्यापीठ अधिसभा निवडणुकीचा नारळ फुटला

sinet

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवीधर अभिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी जयकर ग्रुप परिवर्तन पॅनल कडून आज अनिकेत  कॅन्टीन ला पत्रकार परिषद घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला . निवडणुकीला काही दिवस उरले असतांना विद्यापीठात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

दिवाळी नंतर अधिसभा निवडणुकसाठी मतदान होणार असून जयकर पॅनल विद्यापीठ राजकारणात नवीन असल्यामुळे एक महिना आधीच प्रचाराला सुरवात केली आहे. हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 पारित झाला. विद्यापीठ निवडणूक संदर्भात झालेल्या बदलानंतर पहिल्यांदा निवडणूक होत आहे. विद्यापीठामध्ये अधिसभा हे सर्वोच सभागृह असून या सभागृहाला अनेक महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार असतात . तसेच सभागृहामध्ये विद्यापीठ आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकाचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे विद्यापीठात निवडूनकीत तीन पॅनल आमने सामने असून निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थांना विद्यापीठात असंख्य प्रश्न असतात. पूर्वी विद्यापीठात 104 अधिकारी होते मात्र विद्यार्थांना त्यांचा काहीच लाभ झाला नाही. ग्रंथालयाचा प्रश्न, बस प्रवास, कॅन्टीन चे प्रश्न विद्यार्थांना भेडसावणाऱ्या समस्या असून या सर्व समस्यांचा विरोधात लढण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
संदीप शिंदे , जयकर ग्रुप पॅनल प्रमुख उमेदवार (सिनेट) पुणे विद्यापीठ

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...