शिक्षकाचा पगार देण्यासाठी २० हजार रूपयांची लाच

corruption

परभणी इथल्या एका उर्दू शाळेत शिक्षकाचा पगार देण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेतांना मुख्याध्यापिकेसह शाळेचा सचिव आणि शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. कामेल उर्दू शाळेत एका शिक्षकाच्या सहा महिन्यापासूनच्या पगारातली २० टक्के रक्कम देण्याची मागणी शहाना बेगम या मुख्याध्यापिकेनं केली होती, त्यापैकी २० हजार रूपयांचा हप्ता शाळेजवळच्या एक घरात शिपायाकडे देत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या शिपायासह मुख्याध्यापिका आणि लिपिकाला अटक केली.