विनोद तावडेंच्या कार्यालयात चालते टक्केवारी; राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मालिकांचा आरोप

आधीच वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीचा सामना करावा लागत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मात्र यावेळी कारण आहे ते त्यांचे ओएसडी असलेले डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपाचे.

विनोद तावडे यांचे ओएसडी असलेले डॉ. चारुदत्त शिंदे यांनी एक लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप अल्पसंख्यांक विभागातीलच कक्ष अधिकारी शशिकांत साळुंखे यांनी केला. यानंतर आता विनोद तावडे यांच्या कार्यालयात टक्केवारी चालत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

अल्पसंख्यांक विभागाचे कक्ष अधिकारी शशिकांत साळुंखे यांनी आपल्या विभागाच्या प्रधान सचिवांना या संबंधी लिहिलेल्या पत्रामुळे तावडे यांचे ओएसडी डॉ. चारुदत्त शिंदे अडचणीत आले आहेत. मात्र शिंदे यांच्यावर कारवाई न करता साळुंखे यांनाच निलंबित करण्यात आलंय. त्यामुळे सरकार चारुदत्त शिंदे यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

दरम्यान विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कक्ष अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे ते आरोप करत असल्याचा दावा तावडेंनी केला