सिंहगड किल्ल्यातील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करा !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील सहभागी संघटना आक्रमक

पुणे, ; – सिंहगड किल्ल्याच्या २०१२- १४ मध्ये झालेल्या बांधकामात मोठा गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील सहभागी संघटनांनी आज पत्रकार परिषदेत केली .
किल्ल्याच्या 1 कोटी 39 लाख रुपयांच्या बांधकामात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केला आहे. या संदर्भातील अहवाल पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने जिल्हाधिकारी आणि संबंधितांना सादर केला आहे. त्यावर संबंधितांकडून खुलासा मागवण्याच्या पलीकडे शासनाने काहीही कारवाई केलेली नाही. यात दोषी असलेल्या कंत्राटदार, प्रशासकीय अधिकारी यांना हेतूपुरस्सर पाठीशी घातले जात आहे, असे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे कंत्राटदाराला प्रथम काळ्या सूचीत घालून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची संपूर्ण रक्कम संबंधित कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून व्याजासह वसुल करण्यात यावी, तसेच किल्ल्याचे बांधकाम प्रामाणिक आणि तज्ञ कंत्राटदाराकडून तातडीने करवून घेण्यात यावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. असे न झाल्यास शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील सहभागी संघटनांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला समर्थभक्त सुनील चिंचोलकर, मोहनराव डोंगरे, सिंहगड पावित्र्यरक्षण समितीचे श्री. सागर मते, बजरंग दलाचे पुणे जिल्हा सहसंयोजक नितीन महाजन, सनातन संस्थेचे शंभु गवारे, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले, प्रविण नाईक उपस्थित होते. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी माहितीच्या अधिकारात या किल्ल्यासंदर्भात पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तयार केलेला अहवाल मिळवला आहे. त्यात या बांधकामात गैरप्रकार झाल्याचा आरोप या संघटनांतर्फे करण्यात आला .

You might also like
Comments
Loading...