आरोग्य खात्यातील वरिष्ठ बांबूचा अजब कारभार; स्वतःचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून  केले ६०वर्षे 

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दि.३१ मे २०१८ रोजी वि.पु.घोडगे (अवर सचिव) यांच्या स्वाक्षरीने एक परिपत्रक काढले त्यात सार्वजनिक आरोग्य विभागातील ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या वरिष्ठ २२६ अधिकाऱ्यांना सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या निर्णयासाठी वित्त विभाग आणि राज्य मंत्रिमंडळाची कोणतेही मान्यता घेण्यात आलेली नाहीये.

यावेळी बोलताना रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते पांडुरंग शिंदे म्हणाले की, राज्यात लाखों विद्यार्थी बेरोजगार असताना सार्वजनिक विभागातील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःची तुमडी भरवण्यासाठी घेतलेला हा तुंगलाई निर्णय आहे. असे निर्णय आता सर्व विभागात घेतले जातील त्यामुळे राज्यातील लाखों बेरोजगार युवकांवर उपासमारीची वेळ येईल.

आरोग्य विभागांतील ५८ व्यावर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या २२६ अधिकाऱ्यांना ६० वर्षांपर्यंत कायम करण्यात आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.नितीन बिलोलीकर यांचे हितसंबंध आहेत कारण या २२६ आधिकार्यात ते स्वतः डॉ. नितीन बिलोलीकर व त्यांच्या पत्नी  डॉ. सरोजिनी बिलोलीकर लाभार्थी आहेत.

स्वतः च्या फायद्यासाठी शासनाच्या तिजोरीवर लाखों रुपयांचा दरोडा टाकनाऱ्या त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच सेवानिवृत्तीचे वय ६० केले तो निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीनं तीव्र आदोंलनाचा इशारा देण्यात आला आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...