नगरसेविका सौ. सुजाता शेट्टी यांच्या पुणे मनपा विकास निधीतून नळ टाकीचे उद्घाटन

पुणे: उन्हाळयाचे दिवस सुरु झाल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी प्रश्न उद्भवत आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभाग क्र.१६ (कसबा-सोमवार पेठ) स्थानिक कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी यांनी १५ वर्षे पाण्यापासून वंचित मंगळवार पेठ, गोसावी वस्ती येथील पाण्याचा प्रश्न सोडविला.

यावेळी स्थानिक कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी यांच्या पुणे मनपा विकास निधीतून सदर ठिकाणी नळ टाकीचे उद्घाटन प्रसंगी मा.सदानंद कृष्णा शेट्टी (मा.स्थायी समिती अध्यक्ष पुणे मनपा/वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर काँग्रेस कमिटी), स्थानिक मान्यवर नागरीक तसेच सदानंद शेट्टी मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.