पिंपरी चिंचवड : भाजप नगरसेवकाची भरदिवसा कोयत्याने वार करुन निघृर्ण हत्या

पुणे : आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची भरदिवसा कोयत्याने वार करुन निघृर्ण हत्या करण्यात आली. ही घटना पुणे-आळंदी रोडवर च-होलीजवळ आज (मंगळवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. त्यांना उपचारासाठी तात्काळ पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी कांबळे बांधकाम व्यावसायिक होते. डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आले होते. आज दुपारी चारच्या सुमारास च-होलीजवळ बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत हल्ला केला. हल्ल्यात कांबळेंचा मृत्यू झाला. पण त्यांच्यासोबत कोण होतं? तसंच हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दिघी पोलीस तपास करीत आहेत. त्यांच्या पाठीमागे आई, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

2 Comments

Click here to post a comment