मोफत वापरण्याचे दिवस गेले आता व्हाॅटसअॅपसाठी मोजावे लागणार पैसे

दोन एक वर्षा पूर्वी व्हाॅटसअॅप ने आपल्या ग्राहकांना मोफत सुविधा देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ही सुविधा उपलब्ध देखील करून दिली होती. मात्र व्हाॅटसअॅपच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मॅड इडेमा यांनी वाॅल स्ट्रीट जर्नल ला दिलेल्या मुलाखतीत एक नवीन माहिती दिली आहे.

मोठ्या कंपन्या तसेच संस्थाना व्हाॅटसअॅप व्यावसायिक फिचर देणार आहे. या करता मात्र पैसे मोजावे लागणार आहेत. या फिचरमुळे मोठ्या कंपन्या तसेच संस्थाना आपल्या ग्राहकांशी उत्तमरीतेने जोडता येणार आहे. इतर सामान्य नागरीकांना मात्र व्हाॅटसअॅप मोफत असेल. पैसे भरून कंपन्या आपले अकाउंट व्हेरीफाय करून घेऊ शकतील.

You might also like
Comments
Loading...