वैद्यकीय व्यवसायाचा कॉर्पोरेट धंदा

टीम महाराष्ट्र देशा : सध्याच्या युगात देशाची सुरक्षा जवान करतात, तसेच आपल्या आरोग्याची सुरक्षा फक्त डॉक्टरांच्या हातात असून, डॉक्टरांना समाजात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. आपल्या देशात सर्व प्रकाराचे डॉक्टर्स उपलब्ध आहेत जसे की अॕलोपॕथिक, होमिओपॕथिक,आयुर्वेदीक तसेच विविध प्रकाराचे विशेष रोग तज्ञ. डॉक्टरांचे काम म्हणजे पेशंट नीट करणे विविध आजारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे. मनुष्य देवा नंतर जर कुणावर विश्वास ठेवत असेल तर तो डॉक्टर होय. परंतु हाच तो डॉक्टर औषध कंपन्यांमुळे ग्रासला गेला आहे. डॉक्टर आणि औषध कंपन्यांमुळे अक्षरशः पेशंटचे कंबरडे मोडले जात आहे.

 

भारतीय औषध व्यवसायामध्ये जवळजवळ २ हजार कंपन्या येतात सध्या या कंपन्यामध्ये खूप प्रमाणात स्पर्धा सुरू असून, आपल्या कंपनीचा जास्तीतजास्त धंदा व्हावा आपणच जास्त पैसे कमवावे यामध्ये चढाओढ लागलेली सध्या पहायला मिळत आहे. जर आपला सेल वाढवायचा असेल स्पर्धेत टिकायचे असेल तर त्याला एकच उपाय म्हणजे डॉक्टरांशी डील करणे होय. या डील मध्ये एकवेळ पेशंटचा जीव गेला तरी चालेल पण आपले पोट भरले पाहिजे. असे धंदे सध्या डॉक्टर आणि औषध कंपन्या करताणा पहायला मिळत आहे.

डॉक्टर आणि औषध कंपन्यामध्ये होणारे डील म्हणजे काय?

तर डॉक्टरांनी पेशंटला औषध लिहून देण्यासाठी औषध कंपन्याकडून काही विशिष्ट प्रकारची मागणी होय.सध्याच्या कंपन्या जर डॉक्टरांनी पेशंटला आपल्याच कंपन्यांचे औषध लिहून देण्यासाठी विविध प्रकारच्या गिफ्ट-आर्टिकल, कॕश कार्ड, परदेशात किंवा आपल्या देशात फिरण्यासाठी होणारा खर्च, तसेच सोन्याच्या, चांदीच्या वस्तू, किचन मधील वस्तू आणि रोख रक्कम तसेच विविध मोठ-मोठे हॉटेलमध्ये पार्टी, आणि डॉक्टरांच्या प्रिस्कीपशन पॕड, पेशंटला देण्यात येणाऱ्या फाईल्स, विजीटींग कार्डस अशा प्रकारे दिल्या जातात. या आधारे डॉक्टर पेशंटला त्या त्या कंपनीचे औषध प्रिस्कीपशन वर लिहून देतात.डॉक्टरांना दिलेल्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी किंवा डॉक्टरांवर केलेल्या खर्चाच्या बदली औषध कंपन्या डॉक्टरांकडून दिलेल्या किमतीच्या पाच पट रक्कम वसूल करते.


उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीने एका डॉक्टर ला १० हजार रूपये खर्च केले तर त्याबद्दल डॉक्टरांकडून कमीतकमी ५ पट म्हणजे पन्नास हजार रूपयांपर्यंत वसूल करते. मग कंपनीने एखादे औषध खूप महाग विकले तरी त्याचे घेणे-देणे डॉक्टरांना रहात नाही. औषध कंपन्याकडून घेतलेल्या वेगवेगळ्या डील मुळे पेशंटचा विचार डॉक्टरांकडून होत नाही. आणि गरज नसताना तसेच पेशंटला औषधे द्यायची तसेच महाग औषध द्यायचे असे सर्रास प्रकार घडताना दिसत आहेत. औषध कंपन्या नेमलेल्या वैद्यकिय प्रतिनिधी मार्फत अशा डील करीत आहेत. एखाद्या प्रोडक्टसाठी जर कंपनी आणि डॉक्टरांचे डील झालेले असेल तर गरज नसताना किंवा जाणूनबुजून डॉक्टर पेशंटला औषध प्रिस्कीपशन लिहून देतात याचे परिणाम पेशंटला सोसावे लागत आहे. औषध कंपन्या आणि डॉक्टरांवर केंद्र सरकारचे कंट्रोल नसल्यामुळे हा मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

*मेडिकल दुकानदारांकडूनही लूट सुरू*
डॉक्टरांबरोबर मेडिकल दुकानदारांनाही औषध कंपन्याकडून औषधांवर एक्स्ट्रा अॉफर देण्यात येते, म्हणजे औषधांच्या १० पाकीटांवर कमीतकमी १ किंवा जास्तीतजास्त १० पाकीट मोफत अशा अॉफर कंपन्याकडून मेडिकल विक्रेत्याला देण्यात येते. नियमानुसार कंपन्याकडून दिल्या गेल्याल्या अॉफर पेशंट ला देणे बंधनकारक आहे, परंतु कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे अशा प्रकारची लुट सुरू आहे.

अाता पुण्याकडे अधिक लक्ष देणार : उद्धव ठाकरे

गुणकारी आलं…