नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा जगातील अनेक देशात महामारीनं डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने ओमायक्रॉन व्हेरिएंट कमी घातक आहे. मात्र असं असलं तरी तो ज्या वेगाने लोकांना संक्रमित करत आहे ते पाहता बहुतांश देशात कोरोनाची तिसरी लाट धडकली आहे. दिवसाला लाखो लोकं कोरोनाबाधित होत असल्याने देशाची तसेच राज्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन संकटात आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचं एकत्रित असलेला ‘डेल्टाक्रॉन’(Deltacron) व्हेरिएंटचा शोध लागला आहे. सायप्रस विद्यापीठातील जैववैज्ञानिक प्राध्यापिका लिओनडिओस कोस्ट्रिकिस यांनी या बाबत माहिती दिली आहे. डेल्टाच्या जीनोममध्ये ओमायक्रॉनचे अंश सापडल्याने त्याला डेल्टाक्रॉन असं म्हटलं आहे. रिपोर्टनुसार, संशोधकांच्या या टीमला या व्हेरिएंटचे २५ रुग्ण आढळले आहेत. या व्हेरिएंटचा धोका आणि प्रभाव कितपत असू शकेल हे सांगणं आत्ताच शक्य नाही असं कोस्ट्रिकिस यांनी सांगितले आहे.
समोर आलेल्या माहिती नुसार, सायप्रस विद्यापीठातील संशोधकांच्या या टीमला डेल्टाक्रॉन या व्हेरिएंटचे २५ रुग्ण आढळले आहेत. या व्हेरिएंटचा धोका आणि प्रभाव कितपत असू शकेल हे सांगणं आत्ताच शक्य नाही, असं प्राध्यापिका कोस्ट्रिकिस यांनी सांगितले आहे. तसेच संशोधकांनी हा रिपोर्ट GISAID कडे पाठवला आहे. जी आंतरराष्ट्रीय डेटाबेसनुसार, व्हायरस ट्रॅक करते. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जगात झपाट्याने प्रार्दुभाव होत असल्याने डेल्टाक्रॉन व्हेरिएंट समोर येत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- गोव्यात काँग्रेसच्या सक्षम नेतृत्वाअभावी १७ चे २ आमदार झाले-संजय राऊत
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय ते आम्ही यापूर्वीच केलेले”, ममतांचे मोदींसमोरच विधान
- ‘जिवाची काळजी असेल तर…’ पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी साधला मोदींवर निशाणा
- “गोव्यातील निवडणुकीत पैशांचा पाऊस!”, राऊतांचा रोखठोकमधून गडकरींवर निशाणा
- पुढील चार दिवस महराठवाडा, विदर्भात गारपीटीसह पावसाचा इशारा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<