इटलीनंतर ‘हा’ देश सापडला कोरोनाच्या विळख्यात, चीनलाही टाकले मागे

corona

स्पेन : कोरोनाने जगात अनेक देशांमध्ये चांगलेच हातपाय पसरवले आहेत. आतापर्यंत जगात 471,802 नागरिक कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता इटली पाठोपाठ स्पेनमध्येही कोरोना झाल्याने मृत होणाऱ्यांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता इटली पाठोपाठ स्पेन देखील कोरोनाग्रस्त झाल्याचं दिसत आहे.

कोरोनाव्हायरसची सर्वाधिक प्रकरणे असलेला स्पेन जगातील चौथा देश आहे. तर, मृतांच्या बाबतीत स्पेनने चीनलाही मागे टाकले आहे. स्पेनमध्ये 49 हजार 515 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 हजार 647 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आता स्पेनच्या उप-पंतप्रधान कारमेन कॅल्व्हो यांनाही कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये सध्या भयावह परिस्थिती आहे.

दरम्यान कोरोनामुळे इटलीमध्ये सर्वाधिक मनुष्यहानी झाली आहे. आतापर्यंत 7 हजार503 जण कोरोनाहून मृत झाली आहेत. तर आताही इटलीमध्ये 74 हजार 386 रुग्ण कोरोनाशी सामना करत आहेत. दुसरीकडे चीनपासून सुरु झालेल्या या रोगाचा प्रवास आता काहीसा थांबला असल्याचं बोललं जात आहे. वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात चीनला यश आले असल्याचं बोललं जात आहे. चीनमध्ये सध्या 81 हजार 285 रुग्ण होते. त्यापैकी 74 हजार 051 रुग्ण हे बरे झाले असल्याचा दावा चीनने केला आहे. तर केवळ 3 हजार 287 रुग्ण हे मृत झाल्याचं सांगण्यात येत आहे.