बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर कोसळला दुःखाचा डोंगर

corona

मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. दिग्दर्शक कुणाल कोहली याच्यावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘हम तुम’ आणि ‘फना’ यांसारख्या हिट सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या कुणाल कोहलीच्या घरातील सदस्याचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला.कुणालने ट्वीट करत यासंबंधी सविस्तर माहिती दिली.

दिग्दर्शक कुणाल कोहलीची मावशी शिकागो येथे रहायची. त्याने ट्वीट करत म्हटलं की, ‘आठ आठवड्यांच्या संघर्षानंतर करोना व्हायरसमुळे मावशीचं निधन झालं. आमचं कुटुंब फार मोठं आहे आमि सारेच एकमेकांच्या जवळ आहेत. या काळात आम्ही एकत्र येऊ शकत नाही. मावशीला गमावणं जेवढं दुःखद आहे तेवढंच दुःखद घरच्यांसोबत राहता येऊ न शकणं आहे. आई, मावशी, मामा यांना या काळात एकत्र भेटता येत नाहीये याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर पाहणं फार कठीण आहे.’

पाकिस्तानच्या धडाकेबाज क्रिकेटपटूला झाला कोरोना…

दरम्यान, दुसऱ्या बाजूला हिंदी, गुजराती आणि भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. एबीपी न्यूजशी बोलताना स्वत: किरण कुमार यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं आहे. लक्षणं नसल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये न ठेवता घरीच ठेवलं आहे. मी ठीक असून काळजी करण्याचं कारण नाही असं किरण कुमार यांनी सांगितलं आहे.

नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५० हजारांचे अनुदान तात्काळ वर्ग करण्याची मागणी