मराठवाड्यातील शिवसेनेचा ‘हा’ लोकप्रिय नेता अडकला कोरोनाच्या विळख्यात

shivsena

उस्मानाबाद – राज्यात कोरोनाने थैमान घातले असून अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सवर्सामान्य नागरिक ते सेलिब्रेटी,राजकीय नेते खेळाडू अश्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येत आहे. यातच आता आणखी एका नेत्याच्या नावाची भर पडली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आमदार ज्ञानराज चौगुले हे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा-लोहारा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. ज्ञानराज चौगुले यांच्यावर उमरगा येथे उपचार सुरु होते , मात्र चौगुले यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला हलवण्यात आलं असल्याची माहिती आहे.

आमदार चौगुले हे चार महिन्यांपासून कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी प्रशासनासोबत सक्रिय काम करीत आहेत. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी त्यांनी प्रथम रॅपिड अँटीजेन चाचणी केली होती; मात्र ती निगेटिव्ह आली होती. मंगळवारी (ता.२८) त्यांनी स्वॅब दिल्यानंतर अहवाल इन्क्ल्युसिव्ह आला होता. पुन्हा गुरुवारी (ता. ३०) सकाळी स्वॅब दिल्यानंतर सायंकाळी उस्मानाबादच्या प्रयोगशाळेतील चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार चौगुले यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, मधुमेह असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रात्रीच स्वतःच्या वाहनातून उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले.

महत्वाच्या बातम्या-

आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे