सरकारच्या ‘कोरोना’विरोधी लढ्यात लतादीदींनी केली लाखोंची मदत

lata mangeshkar

मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच आता ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये काही रक्कम जमा केली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये २५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली असून याविषयीची माहिती लता मंगेशकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तसंच प्रत्येकाला जसं शक्य होईल तशी मदत करावी असं लतादीदींनी आवाहनही केलं आहे.

तसेच पुढे त्या म्हणाले, ‘माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या क़ोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ति मदत करावी’, असं लता मंगेशकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अनेक उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे.कोरोनाशी सामना करण्यासाठी रिलायंसने पीएफ रिलीफ फंडला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय रिलायंस कंपनी महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला प्रत्येकी 5 कोटींची मदत करणार आहे.