#coronavirus : गेल्या २४ तासांमध्ये ७,९६४ नव्या रुग्णांची भर

corona

मुंबई : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. चिंतेची बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांमध्ये ७,९६४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७३ हजार ७६३ झाली आहे. २४ तासांत तब्बल २६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक म्हणजे देशात आतापर्यंत ८२ हजार ३७० जणांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे देशात सध्या ८६ हजार ४२२ जणांवर उपचार सुरू आहेत. तर चिंतेची बाब म्हणजे देशात आतापर्यंत ४९७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुढे शहरात देखील कोरोचा प्रसार वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहर आणि जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 302 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 186 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.