#Corona Update : भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा हजारवर, राज्यातील रुग्णांची संख्या चिंताजनक

नवी दिल्ली : भारतातील कोराबाधीतांचा आकडा वाढत असून हा आकडा आता हजारच्या वर गेला आहे. सध्या देशातील कोरोनाबाधीतांचा आकडा हा 1136 गेला आहे.  गेल्या 24 तासात कोरोनामुळे देशात सहा जणांना आपला प्राण गमवावे लागले आहे. तर 106 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत बंदची घोषणा केली आहे. एवढी खबरदारी असून देखील देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही हजारवर गेली आहे. राज्यात देखील एका बाजूला रुग्ण बरे होत असतानाचं दुसऱ्या बाजूला कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 203वर गेला आहे.

देशात महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. केरळमधील रुग्णांची संख्या ही आता 202वर गेली असून नवीन रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. देशात अजून 27 राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.  दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरी काही नागरिक प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करताना दिसत आहेत.