रामदेव बाबांच्या कोरोनावरील औषधाला मोदी सरकारचा झटका, घेतला हा निर्णय

Baba-Ramdev_

नवी दिल्ली: मोठ्या दिमाखदार सोहळ्यात योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावरील आयुर्वेदिक औषध लॉचं केल आहे. कोरोना रुग्णाला बर करण्यासाठी हे औषध गुणकारी असल्याचा दावा बाबा रामदेव यांच्याकडून करण्यात आला आहे. कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यामुळे पतंजलीकडून तयार करण्यात आलेले हे औषध सर्वाना दिलासा देणारे ठरणार आहे.

एका बाजूला बाबा रामदेव यांनी येत्या आठवडाभरात पतंजलीचे ‘कोरोनील’ हे औषध आठवडाभरात बाजारामध्ये उपलब्द होणार असल्याचं सांगितले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय आयुष मंत्रालयाने औषधावर सध्या निर्बंध लादले आहेत. रामदेव यांनी हे औषध कोरोनाला बर करत असल्याचा दावा केला असला तरी जोपर्यंत या दाव्याची सत्यता आणि वैज्ञानिक तथ्य पडताळले जात नाही, तोपर्यंत पतंजलीने याची जाहिरात करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. जगभरातील रुग्णसंख्या ९२ लाखांवर पोहचलीय तर ४ लाख ७४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर ४९ लाख ५६ हजार जणांची कोरोनाच्या आजारातून मुक्तता झाली आहे. भारतामध्ये देखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. एका बाजूला कोरोनाचा विळखा वाढत असताना दुसरीकडे त्यावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्यावर हजारो डॉक्टर वैज्ञानिक काम करत आहेत. आता योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनातून १०० टक्के बरे करणारे औषध आणल्याचा दावा केला आहे.

कोरोनिलमध्ये गिलोय, अश्‍वगंधा, तुलसी, श्‍वसारी रस आणि अणू तेलाचे मिश्रण आहे. हे औषध दिवसातून दोन वेळा घ्यावे लागणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी या औषधाचे दररोज सेवन करावे लागणार आहे. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं.

कोरोनिल औषध तयार करण्यासाठी दोन प्रकारे उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला आहे क्लिनिकल कंट्रोल स्टडी आणि क्लिनिकल कंट्रोल ट्राय या पद्धतीचा वापर केला असल्याचं रामदेव यांनी सांगितलं. क्लिनिकल कंट्रोल स्टडीसाठी दिल्ली, मेरठसह देशातील इतर भागात अनेक रुग्णांवर प्रयोग केले. यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

उर्वरित शेतकरी कर्जमाफीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा…

विनापोस्टिंगच्या अधिकाऱ्यांना लवकरच जबाबदारी; अजित पवारांचा शब्द

‘शेतकऱ्यांची खरीप हंगाम पेरणीपूर्व कामे लॉकडाऊनमुळे रखडू नयेत याची दक्षता घ्या’