कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक, शाळांमध्ये आधार नोंदणीची सक्ती रद्द करण्याची मागणी

औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड सरल प्रणालीत नोंदणी अद्यावत करून ९० टक्के असलेले प्रमाणपत्र आपल्या कार्यालयात सादर करण्याकरिता शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी पत्र पारित केलेले आहे. व प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अतिशय कमी वेळ दिलेली आहे. सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळा व आधार कार्ड सेंटर बंद आहे. आधार कार्ड नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याकरिता तात्पुरती स्थगिती देण्यात यावी किंवा शाळा पूर्ववत सुरू होईपर्यंत मुदत द्यावी याबाबत हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनने शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना निवेदन दिले आहे.

राज्यातील सर्व माध्यमिक व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधार कार्डची जोडण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये सरल प्रणाली विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपडेट करण्याच्या सूचना मुख्याध्यापक शिक्षकांना दिल्या आहेत. मात्र अनेक मुलांनी आधार कार्ड काढलेले नाही. सध्या शहर व जिल्ह्यातील ८० टक्के आधार कार्ड सेंटर बंद आहे. तसेच कोरोनामुळे मुलांना आधार कार्ड काढण्यासाठी घेऊन जाता येत नाही त्यातून मार्ग कसा काढावा असा प्रश्न लोकांना पडला आहे.

विद्यार्थ्यांचे नावात व आधार कार्ड मध्ये तफावत असल्यामुळे आधार कार्ड अपडेट मध्ये शिक्षकांना व मुख्याध्यापकांना अडचणी येत आहे. व शासनातर्फे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना असल्याने आधार दुरुस्ती साठी पालक मनस्थितीत नाही. शाळांना आधार कार्ड नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याकरिता तात्पुरती स्थगिती देण्यात यावी किंवा शाळा पूर्वत सुरू होई पर्यंत मुदत द्यावी ही याबाबत हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मेयार असोसिएशनचे मराठवाडा अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना निवेदन सादर करून विनंती केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP