#CoronavirusEffect : नववर्षाच्या मुहूर्ताला कोरोना’चं ‘ग्रहण’

मुंबई : नववर्षातील मोठा तसेच साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा सण. नवीन कामांसाठी, सोने – चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गुढीपाडव्याचा मुहूर्त निश्चित करतात. सर्वजण आनंद, सुख-समृद्धीची गुढी दारी उभारून नवीन वर्षाची सुरुवात करतात.

मात्र यावर्षी गुढीपाडव्याच्या सणावर ‘कोरोना’चे सावट दिसून येत आहे. चीन’च्या वूहन मधून जन्म घेतलेल्या ‘कोरोनो’ विषाणूच्या प्रदुर्भावाने देशासह, राज्यात मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी करू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, स्वच्छता राखा, आवशक्यता असेल तरच घराबाहेर पडा, प्रवास टाळा,’ असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला केलं आहे.

तसेच दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठा ग्राहकांसाठी सज्ज असतात. खूप मोठ्या प्रमाणात गुढीपाडव्याला बाजारपेठेत आर्थिक उलाढाल होतं असते. मात्र यावर्षी विक्रेत्यांवर कोरोना’चे सावट असणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील घाऊक आणि किरकोळ व्यापार आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे.

मात्र किराणा, भाजीपाला, दूध आणि मेडिकलची दुकानं सुरु राहणार आहेत.जीवनश्यक वस्तू वगळण्यात आल्याने सर्वसामान्यांना दिलासा आहे. मात्र गर्दी टाळण्यासाठी शक्य ती सर्व खबरदारी वैयक्तिक पातळीवर नागरिकांनी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

याच प्रमाणे सतत सोन्याचे भाव देखील उतरत आहेत. मागील 10 दिवसांत सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. तसेच सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 39 हजार 661 रुपये एवढे झाले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचे दर 1949 रुपयांनी घसरले असून, 39,661 रुपयांवर आले आहेत. गुढीपाडव्या तोंडावर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठी ही खुशखबर आहे. याचप्रमाणे चांदीचा दर प्रति किलो 6445 रुपयांनी घसरला. सोमवारी दिल्लीत सोने 455 रुपयांनी वाढून 41,610 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. चांदी मात्र 1,283 रुपयांनी घसरून 40,304 रुपये किलो झाली. शुक्रवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 42017 रुपयांवर बंद झाले होते.

दरम्यान, कोरोना’मुळे नागरिकांमध्ये खबराटीचे वातारण आहे. मात्र सण साजरा करताना आरोग्याची काळजी घेणे देखील प्रत्येकाची प्राथमिक जबाबदारी आहे. कोरोना’शी दोन हात करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, राज्य शासनाने केलेल्या आवाहनाचे पालन केले पाहिजे.