कोरोनाचा कहर! उस्मानाबादेत ६७६ नव्याने बाधित तर ११ जणांचा कोरोनाने गेला बळी

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत मात्र तरीही रुग्णांची वाढ दिवसेंदिवस होतंच आहे. मंगळवारी दिवसभरात ६७६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर ११ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील ४२१ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते तर २२०४ जणांची रॅपिड ॲन्टीनज टेस्ट करण्यात आली होती. यापैकी ६७६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता ४६२०७ पर्यंत वाढला आहे. त्यापैकी ३८५२८ जण यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज घेवून घरी परतले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १०५७ जणांचा मृत्यू झाला आहे. ६६२२ जणावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ७४३ जणांनी दिवसभरात कोरोनावर मात करून डिस्चार्ज घेतला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

उस्मानाबाद तालुक्यातील १८७ , तुळजापूर ५९, उमरगा ५६, लोहारा ६०, कळंब ७८, वाशी ६८, भूम ९६ तर परंडा तालुक्यातील ७२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुळे दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यात उस्मानाबाद, डिग्गी, वंथळ, बोरी,गावसूद, इंदापूर, वरूडा, सरमकुंडी,थोडसरवाडी, पिंपळगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.९३ टक्के तर मृत्यूदर २.३० टक्के आहे. आतापर्यंत २ लाख ४८ हजार ८५३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ४६२०७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचे शेकडा प्रमाण ३५.५९ टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP