आयपीएलवर कोरोनाचे सावट; उद्याचा चेन्नई विरुद्ध राजस्थान सामनाही रद्द

ipl

अहमदाबाद : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वीरीत्या पार पडला होता.

मात्र आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने या स्पर्धेत शिरकाव केला. सोमवारी दिवसभरात २ आयपीएल संघातील आणि दिल्ली येथील ग्रांउड स्टाफमधील सदस्याना कोरोनाची लागण झाली. याच पार्श्वभूमिवर करन ठकराल आणि इंदर मोहन सिंग यांनी आयपीएलचे सर्व सामने रद्द करा आणि दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानाचं कोवीड सेंटरमध्ये रुपांतर कारा अशी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली आहे.

परंतु आता आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संघ व्यवस्थापनानं आजचा सामना खेळण्यास असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात बुधवारी होणारा सामना देखील रद्द करण्यात आला आहे. लक्ष्मीपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे आणि त्याच्याशी संपर्कात असलेले संघातील खेळाडूंच्या पुढील तीन चाचण्या जोवर निगेटिव्ह येत नाहीत तोवर संघ सामना खेळू शकत नाही, अशी भूमिका चेन्नई सुपरकिंग्ज संघानं घेतली आहे. संघाच्या खेळण्याबाबत चित्र स्पष्ट होण्यासाठी पुढील सहा दिवसांचा कालावधी लागेल असं चेन्नईकडून सांगण्यात आलं आहे.

आयपीएलमध्ये मंगळवारी दिल्ली येथे मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात सामना होणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी या मैदानावरील ग्राउंड स्टाफमधील ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे हा सामना होणार कि नाही याबाबत अजुनतरी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे.

महत्त्वाच्या बातम्या