आयपीएलवर कोरोनाचे संकट वाढले; कोलकाता पाठोपाठ आता चेन्नईचे ३ सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : राज्य आणि भारतात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या सावटाखाली भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र कोरोनाने आयपीएलला गाठले.

सोमवारी ३ मे रोजी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार केकेआरच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर काही तासातट चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातुन कोरोनाशी संबधीत वृत्त हाती आले आहे. चेन्नई संघाचे सीईओ कासी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस क्लिनर यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. यादरम्यान चेन्नईचा संपुर्ण संघ दिल्लीतच आहे. संघातील उर्वरित सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. हे अहवाल रविवारी केलेल्या चाचणीनंतरचे आहे.

संघाच्या तीन सदस्यांचा अहवाल हा रविवारी झालेल्या चाचणीचा आहे. मात्र सोमवारी केलेल्या चाचणीनंतर जर त्यांचा आहवाल पुन्हा सकारात्मक आला तर त्यांना बायोबबलमधुन बाहेर जाउन क्वारंटाईन व्हावे लागेल. यानंतर २ चाचणी निगेटिव्ह आली तरच संघासोबत बायोबबलमध्ये प्रवेश मिळेल. ही बातमी समोर येण्याआधी सोमवारी ३ मे रोजी संध्याकाळी होणारा आयपीएलचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. कारण केकेआर संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या