#corona_update : कोल्हापुरात कोरोनाचे एकाच दिवसात 23 रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 259

corona

कोल्हापूर : राज्यातील कोरोनाचाबाधितांचा आकडा आता 41642 वर गेला आहे. तर त्यातील सर्वाधिक म्हणजे 27251 रुग्ण हे एकट्या मुंबईतून आहेत. तसेच कोल्हापूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी एका दिवसात 31 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

सकाळी 4 ते रात्री 23 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 259 वर पोहोचली आहे. कोल्हापूरचे स्थानिक प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर नागरिकांना गरज पडत असेल तरच बाहेर पडा असे आवाहन करत आहे. सध्या लॉकडाऊन शिथिल केला असल्याने अनेक उद्योगधंदे व व्यवसाय आणि बाजार पेठा सुरु झाल्या असल्याने नागरिक घरा बाहेर पडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी न बाळगल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.

तसेच पुण्यात देखील कोरोनाबाधितांचा आकडा हा 5 हजारच्या वर गेला आहे. तर शुक्रवारी एका दिवसात पुण्यात सर्वाधिक 358 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत.

पुण्यातील रुग्णांचा आकडा आता 5167 वर गेला असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरात काल तब्बल 291 कोरोना रूग्णांची वाढ झाली असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी कोरोना बळींची संख्या 257 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 2552 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

‘कव्वे की चोंच मारने से पहाड नहीं तुटते’, अमोल मिटकरींची भाजपवर सडकून टीका

आदित्य ठाकरेंनी खालील पातळीचा विश्वविक्रम याबद्दल बोलूच नये, कारण…

#Amfan : हवाई पाहणीनंतर बंगालला १००० कोटींची मदत तर ओडिशाला ५०० कोटींचे अर्थसाह्य : मोदी