#corona_effect : प्रेक्षकांशिवाय मॅॅच म्हणजे वधुशिवाय लग्न : शोएब अख्तर

shoeb akhtar

क्रिकेट : कोरोनाचा फटका हा खेळांना देखील बसला आहे. तर सर्वाधिक फटका हा क्रिकेट बसला आहे. यातून पुन्हा उभं राहण्यासाठी ICCकडून प्रयत्न केले जात आहे. तर प्रेक्षकांशिवाय सामने खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयकडून मांडण्यात येत आहे. यावर अनेक क्रिकेटर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर त्यातली पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची प्रतिक्रिया ही लक्षवेधी ठरली आहे.

स्टेडियमला परवानगी मिळाली असली तरी IPL आयोजित करणे शक्य नाही : BCCI

प्रेक्षकांविना मॅच खेळणं म्हणजे वधुशिवाय विवाह करणं, अशा शब्दात शोएबने प्रेक्षकांचं महत्त्व अधोरेकित केलं आहे. क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षक हवेच असतात कारण ते आपल्या टीमला सपोर्ट करत असतात. आणि त्यांच्या सपोर्टने खेळाडूंच्या मनात एक उर्जा संचारत असते, असं शोएबने म्हटलं आहे.

#Corona : खेळांडूच्या प्रशिक्षण शिबिराबाबत अद्याप कोणताच निर्णय नाही : BCCI

रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे हे क्रिकेट मंडळासाठी व्यवहार्य आणि टिकाऊ असेल, परंतु त्यानं महसूल जमा केला जाऊ शकतो, असं वाटत नाही नसल्याचं शोएब म्हणाला आहे. या वर्षभरात कोरोनाची परिस्थिती सुधरेल, तसंच पहिल्यासारखं खेळाची मैदाने प्रेक्षकांनी खचाखच भरतील आणि आपल्यावरंच हे कोरोनाचं संकट दूर होईल, अशी आशा शोएबने व्यक्त केली आहे.

आफ्रिदी गेला खड्ड्यात… देशासाठी मी बंदूकही उचलेन : हरभजन सिंग

कोरोनामुळे अनेक नियोजित सामने व दौरे हे रद्द करण्यात आले आहेत. मात्र पुढील सामने हे कसे खेळवायचे यावर ICCकडून विचारविनिमय सुरु आहे. कोरोना गेला तरी काही नियम पाळावे लागणार आहेत. त्यामुळे स्टेडियम जरी खेळासाठी खुले झाले तरी यामध्ये गर्दी करता येणार नाही. यासाठी सामने जर खेळवायचे असतील तर ते प्रेक्षकांशिवाय खेळवावे, असा निर्णय ICC कडून घेण्यात येत आहे. मात्र हा निर्णय अनेकांना रुचलेला नाही.

चाहत्यांसाठी खुशखबर ! भारताचा ‘हा’ माजी क्रिकेटपटू करतोय मराठी चित्रपटात एन्ट्री

तर दुसरीकडे युरोपात नियोजित फुटबॉल लीग खेळवली जात आहे. यासाठी प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. तर मैदानात उपस्थितीत असणाऱ्या खेळाडूंना खबरदारी घ्यावी लागत आहे. तसेच संघाबरोबर असणाऱ्या प्रशिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. सध्या युरोपात जर्मनी देशात फुटबॉल लीग खेळवली जात आहे.