दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी…दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकांनं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जे आदेश पाळणार नाही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईही केली जात आहे.याच बरोबर देशभरातील सर्व हॉटेल्स, दारूची दुकाने,बार,पब आदी सर्व बंद करण्याचे आदेश दिले आहे.

टाईम्स नाऊ ने दिलेल्या वृत्तानुसार,कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय येत्या ३० मार्चपर्यंत करण्यात आला होता. आता देशभरात लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व दारूची दुकाने येत्या १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी दारूची दुकाने ३० मार्च पर्यंत बंद ठेवली होती. दारूच्या दुकानांवर गर्दी होण्याची शक्यता होती. तसेच या माध्यमातून या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे ३० मार्च पर्यंत ड्राय डे ठेवण्यात आला होता.

आता त्याला मुदतवाढ मिळाली असून देशभऱात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो देशव्यापी लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्या दिवसापर्यंत म्हणजे १४ एप्रिलपर्यंत ड्राय डे देखील वाढविण्यात आला आहे. या संदर्भातील सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या संदर्भातील माहिती मुंबई जिल्हाधिकारी आणि उपनगर यांना देण्यात आली आहे.

दरम्यान,‘सरकारने सायंकाळी काही वेळासाठी सरकारी परवाना असलेली दारुची दुकानं उघडी ठेवायला हवीत. मला चुकीचं समजू नका. लोक आपआपल्या घरी प्रचंड नैराष्य घेऊन थांबले आहेत. त्यांच्या अवतीभवती प्रचंड अश्चितता आहे,’ अशी मागणी अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे.