औरंगाबाद : शहरात १२ फिव्हर क्लिनिक ; सामान्य रुग्णांच्या समस्या कमी होणार

औरंगाबाद : कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शहरातील अनेक खाजगी दवाखाने बंद आहेत. महापालिका तसेच शासनाद्वारे या डॉक्टरांना दवाखाने सुरु ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाच्या या मागणीला विशेष प्रतिसाद मिळत नसल्याने आता महापालिकेने १२ ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या तीन दिवसात या सुविधा उपलब्ध होणार आहेत. खाजगी दवाखाने बंद असल्याने सामान्य सर्दी, खोकला, ताप असणाऱ्या रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

संचारबंदी मुळे अनेक ठिकाणी नाकाबंदी असल्याने नागरिकांना बाहेर फिरणे शक्य नाही त्यामुळे अशा परिस्थिती मध्ये आजारी असणाऱ्यांना आपल्या घरापासून जास्त दूर असलेल्या रुग्णालयात जातायेत नाही. अशा रुग्णाची तपासणी करण्यासाठी शहरात महापालिकेद्वारे चार ठिकाणी, आयएमएतर्फे सहा ठिकाणी आणि एमजीएम व धूत मध्ये अशा १२ ठिकाणी तपासणी केली जाणार आहे.

सामान्य सर्दी-खोकला असल्यास या ठिकाणी तपासणी करून घरी सोडण्यात येणार आहे. तसेच यातून कोरोना संशयित आढळल्यास पुढील तपासणी साठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येईल. एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, इओसी पदमपुरा, समाजकल्याण हॉस्टेल किलेअर्क, एमआयटी हॉस्टेल, धूत हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल, आयएमए मिनी हॉल, एन-२, महाजन कॉलनी, जवाहर कॉलनी, भडकलं गेट, कांचनवादी, एमटू टीव्ही सेंटर या १२ ठिकाणी हि सुविधा उपलब्ध आहे.

दरम्यान, कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे पालन शहरातील अनेक नागरिक करतांना दिसत आहेत मात्र अजूनही काही टवाळखोर विनाकारण शहरात फेरफटका मारायला निघतातच हे लक्षात आल्याने आता शहरातील काही भागावर ड्रोनची नजर असणार आहे.

गुरवार (दि.०9) पासून या कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील आझाद चौक, रोशन गेट आणि कटकट गेट या भागात पहिल्या दिवशी ड्रोनने नगर ठेवण्यात आली. विनाकारण फिरणारे, समूह करून काट्यावर बसणारे, पोलिसांची नजर चुकवून पळवाटांनी प्रवास करणारे तसेच रात्री उशिरा घराबाहेर पडणारे आशा सगळ्यानवर आता ड्रोन द्वारे नजर ठेवून कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे.