अंतरराष्ट्रीय : कोरोनाने जगात थैमान घातले आहे. विकसित देश देखील कोरोनामुळे घाईला आले आहेत. असे असतानाचं सर्वच देश कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेक प्रयोग शाळांमध्ये कोरोनावरची लस बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी करोनावरील लस येण्यासाठी दोन वर्ष लागतील, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) विशेष दूत डेव्हिड नाबारो व्यक्त केला आहे. त्यामुळे आता कोरोनाबरोबर जगायला शिका असेही ते म्हणाले आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राने याबबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
लस संदर्भात डेव्हिड नाबारो म्हणाले की, मला हे सांगायचं की, हा विषाणू न रोखता जगभरात पसरू दिला, तर अनेक लोकांना संसर्ग होईल. त्याचबरोबर असंख्य लोक मरण पावतील. करोनाविषयी सगळ्या गोष्टी अजून आपल्याला समजू शकलेल्या नाहीत. हा आजार श्वसन विकाराबरोबरच शरीरावर परिणाम करू शकतो. करोनावरील लस पुढील दोन वर्षे तरी माणसाच्या मदतीला येणार नाही. त्यामुळे मी प्रत्येकालाच दोन वर्ष तरी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेत जगणं शिकायला हवं.
पुढे डेव्हिड नाबारो म्हणाले की, भारतीय नागरिक करोनाशी जुळवून घेत जगू शकतो. अशाच पद्धतीच्या जीवनशैलीनं करोनाला बाजूला ठेवता येऊ शकतं. देशातील प्रत्येक नागरिकाला करोनाविषयी शिक्षित करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतानं ज्या पद्धतीनं करोनाची परिस्थिती हाताळली, त्यातून पुढील टप्प्याला यशस्वीपणे सामोरं जाण्याचा आत्मविश्वास त्यातून मिळाला आहे. उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे भारतातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी जगाच्या तुलनेत कमी आहे. भारतातील रुग्णसंख्या दुप्पटीचा वेग ११ दिवसांचा आहे. हा कालावधी म्हणजे प्रसाराचा वेग कमी करण्यासाठी चांगली संधी आहे, असं मत डेव्हिड नाबारो यांनी व्यक्त केलं.
दरम्यान भरतील कोरोनाबाधितांची संख्या ही 67 हजार 161 वर गेली आहे. तर त्यापैकी 2, हजार 212 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे 20 हजार 969 जण हे आतापर्यंत बरे झाले आहेत. जगात 41 लाख 80 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 2 लाख 80 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यापैकी 14 लाख 90 हजार 776 हे बरे होऊन घरी परतले आहेत.