सिडको वाळूज महानगर कार्यालयात दररोज मिळणार कोरोना लस

vaccination

औरंगाबाद : तिसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद अंतर्गत सिडको वाळूजमहानगर तसेच तिसगाव परिसरातील काही शाळांमध्ये लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात आत्तापर्यंत लसीकरणाला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता शासनाने ८ ते १४ ऑक्टोबरपर्यंत आयोजित केलेल्या मिशन कवच कुंडल मोहिमेअंतर्गत शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत आहे.

तिसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जि.प.शाळा तिसगाव, राजस्वप्नपुर्ती, जि.प.प्रा.शाळा म्हाडा काॅलनी, मालपाणी बात्रा, त्रिमूर्ती सोसायटी गट नंबर १७०, सारा ईलाईट,साक्षीनगरी, यश फार्मा इन्स्टिट्यूट, रोझ बर्ड इंग्लिश स्कुल, पियुश विहार अशा विविध ठिकाणी लसीकरण कॅम्पचे आयोजन करून काॅलनीतील जास्तीत जास्त लसीकरण करून घेतले.

आतापर्यंत जवळपास ७० % लसीकरण याठिकाणी पुर्ण झाले आहे. तिसगाव ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आजपासून नियमित लसीकरण सुरु राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कायमस्वरूपी लसीकरण कॅम्पची सुरूवात अतिरिक्त जिल्हा अरोग्य आधिकारी डाॅ.अभय धानोरकर ,वैद्यकीय आधिकारी डाॅ. जितेंद्र मंडावरे, वैद्यकीय आधिकारी डाॅ.पुष्पलता सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या