‘पुणेकरांनी बनवलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये’ : सुप्रिया सुळे

narendra modi vs supriya sule

पिंपरी-चिंचवड : गेले आठ महिने देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोकांना या रोगाची लागण झाली तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोन लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला आज भेट देत आहेत. याआधी त्यांनी अहमदाबाद आणि हैदराबाद मधील इतर दोन कंपन्यांकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीची प्रगतीची माहिती घेतली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.’ पुणेकरांनी बनविलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांनी निशाणा लावला आहे. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.

‘तुमच्या इथे 1400 कोटी, 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर एक लाख कोटींच्या गप्पा असतात. या गप्पा कोण मारतं तुम्हाला चांगलं माहीत आहेच. आज आहेत ‘ते’ आपल्या पुण्यात. बघा ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’. जग फिरल्यावर शेवटी आमच्या पुण्यातच लस सापडणार आहे. ही लस पुणेकरांनी शोधलीये, नाही तर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली. पुण्यामध्येच ही लस तयार झालेली आहे, पुणेकरांनी ती लस शोधलेली आहे, त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी क्लेम केलं, तर गैरसमज नसावेत,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या