अमेरिकेत 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोना लसीकरण सुरू होणार

जो बायडेन

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचे थैमान सुरू असताना यावर एकच आशेचा किरण आहे तो म्हणजे कोरोना वरील लस मात्र भारतात अद्याप फक्त ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता २५ वर्षांपुढील व्यक्तींना लस यज्ञाची मुभा केंद्र सरकारने द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

त्याच बरोबर करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. करोनाची लस 18 वर्षांपुढील सर्वच नागरिकांना खुली करा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) केली आहे. यासंदर्भात असोसिएशनने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.

या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी करोना व्हायरसवरील लस १८ वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. १ मे ऐवजी १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष म्हणून १०० दिवस पूर्ण होईपर्यंत २०० दशलक्ष डोसचा आकडा पार करु अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासोबतच १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा गाठणारा आणि ६२ दशलक्ष लोकांचं पूर्णपणे लसीकरण करणारा अमेरिका पहिला देश असल्याचंही ते म्हणाले.

त्यामुळे आता भारतात आणि महाराष्ट्रात २५ वर्षांपुढील आणि 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकार कधी देणार ? याकडे राज्यच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या