Corona Vaccination: अंथरुणास खिळलेल्या व्यक्तींना मिळणार आता घरीच लस

Corona Vaccination: अंथरुणास खिळलेल्या व्यक्तींना मिळणार आता घरीच लस

corona vaccine

मुंबई – मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी मुंबई महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगातून आजपासून विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारसोबतच मुंबई महापालिका नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रयत्नशील आहे. बृहन्मुंबई महापालिकेकडून वार्धक्यामुळे आणि दुर्धर आजारपणामुळे हालचाली मंदावलेल्या नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली.

अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांनी महापालिकेनं दिलेल्या संकेतस्थळावर नावनोंदणी करण्याचं आवाहन केल्यानंतर, आतापर्यंत 4 हजारांहून अधिक नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक अशा रुग्णांच्या घरी जाऊन लसीकरण करत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या घटली असली, तरी कोरोनाच्या संभाव्य़ तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेडून नवीन कोविड केंद्रांची उभारणी करून आणखी 10 हजार खाटा वाढवण्यात येणार आहेत. कांजूर मार्ग इथं सिडकोच्या सहकार्यानं 1700 खाटांचं जम्बो कोवीड केअर सेंटर उभारलं जात असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या