बिचुकले कोरोना पॉझिटिव्ह ‘बिग बॉस’ मधून बाहेर?

बिचुकले कोरोना पॉझिटिव्ह ‘बिग बॉस’ मधून बाहेर?

Abhijeet-Bichukale

मुंबई : सध्या छोटया पडद्यावर बिग बॉस हिंदीचे १५ वे पर्व सुरु आहे. या शोमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे याकडे पू्र्ण लक्ष दिलं जात. त्याचाच एक भाग म्हणून निर्मात्यांनी मराठी ‘बिग बॉस सीजन २’ (Bigg Boss) चे सदस्य असलेले अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) यांना कार्यक्रमात आणण्याचं ठरवलं होतं. अभिजित, देवोलिना भट्टाचार्जी आणि रश्मी देसाई यांच्यासोबत कार्यक्रमात एण्ट्री घेणार होते. मात्र कार्यक्रमात जाण्यापूर्वीच बिचुकलेंना कोरोना झाल्याने आता बिग बॉसमध्ये त्यांच्या एण्ट्रीवर संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान बिग बॉस हिंदीच्या ‘वीकेंड का वॉर’ या भागात तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी एंट्री घेतली होती. यात रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले यांचा समावेश होता. मात्र नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत बिचुकले यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे ‘बिग बॉस १५’ मध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न आता स्वप्नचं राहिलं आहे. आता बिचुकले यांच्या जागी राखी सावंत कार्यक्रमात एण्ट्री घेणार आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. राखी कार्यक्रमात जाणार असल्याची बातमी राखीची मैत्रीण आणि ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद हिने दिली आहे. उर्फीने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

राखी सावंत (Rakhi Sawant) तिचा पती रितेश (Ritesh Pandey) सोबत ‘बिग बॉस १५’ मध्ये प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राखीला सध्या क्वारंटाइन करण्यात आलं आहे. क्वारंटाइनचे दिवस पूर्ण झाल्यावर राखी देवोलिना आणि रश्मीसोबत घरात एण्ट्री घेणार आहे. राखी क्वारंटाइनमध्ये असल्याने देवोलिना आणि रश्मी दोघींना देखील घरात जाण्यापासून अडवण्यात आलं आहे. मात्र बिचुकले यांचं घरात जाण्याचं स्वप्न मात्र तुटलं असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केलं जात आहे.

‘बिग बॉस’ स्पर्धक अभिजित बिचुकले, राखी सावंत यांचे काही फोटो पहा.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या