#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही ‘या’ गोष्टी राहणार बंद

नवी दिल्ली : देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतरही कोरोबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे 14 एप्रिलला संपणारे लॉकडाऊन पुढे तसेच चालू ठेवण्याचा विचार केंद्र आणि राज्य सरकारकडून होत आहे. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतरही  केंद्र सरकारने गर्दीची ठिकाणंं जसे की, मंदिर, मॉल, शाळा-कॉलेज, इतर धार्मिक स्थळ   बंद ठेवण्याचाचं निर्णय घेतला आहे.

सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा झपाट्यानं वाढणारा संसर्ग थांबवायचा असेल तर 15 मे पर्यंत देशभरातील अनेक शाळा-कॉलेज, मॉल आणि धार्मिक स्थळ बंद ठेवणं गरजेचं आहे. तिथे नागरिकांना येण्यास काही कालावधिसाठी बंदी घालण्याची शिफारस मंत्रिमंडळाकडून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अनेक राज्यांमधील लॉकडाऊनही 21 दिवसांनंतर म्हणजेच 14 एप्रिलनंतर वाढवला जाऊ शकतो. असं असलं तरीही देशभरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना, शाळा, महाविद्यालयं, उद्यानं आणि मॉल्स 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मोदी सरकार घेण्याच्या तयारीत असल्याची माहितती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान राज्यात  1 हजारहून अधिक रुग्ण तर मुंबईत जवळपास 500 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. वारंवार प्रशासनाकडून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. असं असतानाही कोरोनाग्रस्तांची संख्या भारतात वेगानं वाढताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सूचक वक्तव्य केले होते. देशातील लॉक डाऊन जरी १४ एप्रिलला संपत असला तरी लॉकडाऊन शिथिल होईल असं गृहीत धरू नका असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले आहे. केंद्र सरकार लॉकडाऊन बाबत आढावा घेऊन निर्णय घेणार आहे. त्यानंतर   राज्य सरकार देखील याबाबत आढावा घेऊन लॉकडाऊन उठवण्याच्या  प्रक्रियेला   सुरवात करणार आहे.