#corona : ईदच्या शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांना नवाब मलिकांनी दिल्या सूचना, म्हणाले…

navab malik

मुंबई : मुस्लिम बांधवांचा रमजानचा पवित्र महिना सध्या सुरु आहे. तर आता ईद देखील उद्या आली आहे. या निमित्ताने राज्याचे मंत्री मंत्री नवाब मलिक यांनी रमजान ईदच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मलिक यांनी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच पठण करावी, असे आवाहन देखील केले. कोरोनाचा फटका सणांना देखील बसला आहे. त्यामुळे आता ईद देखील आपल्या घरीच साजरी करावी लागणार आहे.

मलिक म्हणाले की, कोरोना विषाणूच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी राज्यात मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. या दरम्यान आलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले सर्व धार्मिक विधी घरीच पार पाडले. कोणतेही गर्दी होणारे कार्यक्रम टाळून मुस्लिम बांधवांनी तरावीहची नमाज, रोजा सहेरी, रोजा इफ्तार आदी धार्मिक विधी घरीच केले.

अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने तसेच राज्यातील लॉकडाऊनही सुरु असल्याच्या कारणाने रमजान ईदची नमाजही घरीच पठण करण्यात यावी.  विविध मुफ्ती, हजरात व मौलाना आदींनी आपल्याला आवाहन केलचं आहे. त्यास अनुसरुन रमजान ईदचे सर्व धार्मिक विधी घरीच करावेत. ईदनंतर गल्ली, मोहल्ल्यांमध्ये गर्दी करु नका. प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यापेक्षा मोबाईलवरुनच नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्या. जगावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होण्यासाठी दुवा करा, असेही मंत्री मलिक म्हणाले.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील फेसबुक लाइव्ह द्वारे जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, कोरोनामुळे अनेक सण हे शांतेत साजरे करावे लागले. त्यात आत ईद येत आहेत. त्यामुळे मी सर्व मुस्लीम बांधवांना माझ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना आवाहन करतो की, कुठेही गर्दी करू नका. घरातूनच आपली प्रार्थना करा. आणि प्रार्थनेमध्ये महाराष्ट्रासाठी दुवा करा.

महत्वाच्या बातम्या

FB Live : विरोधकांना घेतले फैलावर, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले….

FB Live : CM ठाकरेंनी लॉकडाऊनबाबत केले मोठे विधान, म्हणाले…

#corona : येत्या 15 जून पर्यंत शाळा सुरु होण्याची शक्यता, वर्षा गायकवाडांनी दिले संकेत