मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच देशभरात आता कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अशिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस फुगतच चालला आहे. डिसेंबरच्या मध्याला रोजची रुग्णवाढ केवळ १३ हजार होती ती ४ जाने.ला 58 हजार आणि आता ९० हजारांच्या पुढे गेली आहे. तिसऱ्या लाटेची खरी भीती हीच आहे. त्यात ओमायक्रोनमुळे जगाला आणखी एका नवीन व्हेरिएंटचा धोका आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. म्हणजे नवनव्या व्हेरिएंटची धास्ती काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसले आहे. ते कधी उतरणार, हा जगाला पडलेला प्रश्न आहे. तूर्त तरी त्याचे उत्तर कोणाकडेच नाही. तोपर्यंत सरकारी सूचना आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन हाच एकमेव पर्याय आणि उपाय आहे.’
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढू लागली आहे. पंधरा दिवसांपूर्वी काहीच राज्यांत आणि दोन आकडय़ांत असलेला ओमायक्रोन हा कोरोनाचा भाऊबंद २६ राज्यांमध्ये आणि चार आकडय़ांत वावरू लागला आहे. आकडय़ांच्याच भाषेत बोलायचे तर मागील दिवसाच्या तुलनेत गेल्या २४ तासांत देशभरात थोडेथोडके नव्हे तर ९० हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही वाढ तब्बल ५६ टक्के एवढी प्रचंड आहे. दिवसागणिक कोरोना रुग्ण 50-55 टक्क्यांनी वाढू लागले तर दुसऱ्या लाटेपेक्षाही तिसऱया लाटेतील कोरोनाचा विस्फोट भयंकर असेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आपल्या देशात तर मागील आठ दिवसांत चित्र एकदमच बदलले आहे. देशातील जी रुग्णसंख्या दिवसाला १५ हजार होती ती एका झटक्यात ९० हजारांपर्यंत पोहोचली आहे. हा झपाटा असाच राहिला तर नजीकच्या भविष्यात तिसरी लाट अक्राळविक्राळ रूप धारण करू शकते. दुसऱया लाटेच्या वेळी रोजची रुग्णसंख्या ३-४ लाख होती. त्यावेळी देशभरातील वैद्यकीय यंत्रणा कोलमडूनच पडली होती. उपचार आणि ऑक्सिजनअभावी हजारो रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता तर संक्रमण दर पाचपट आहे. कोरोना आजाराचे स्वरूप तूर्त ‘सौम्य’ दिसत असले तरी रुग्णसंख्येचा भयंकर विस्फोट सगळे चित्र पालटू शकतो. कोरोनाच्या तिसऱया लाटेचा खरा धोका हाच आहे आणि तो जनतेनेही ओळखायला हवा. नेहमीची बेफिकिरी संकट आणखी गडद करू शकते. ही परिस्थिती ओढवली जाऊ नये यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहेच, पण नेहमीप्रमाणे येथे जनतेचेही सहकार्य अपेक्षित आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘चकदा एक्प्रेस’ चित्रपटाचा फस्ट लूक शेअर ; जाणून घ्या कोण असणार महिला क्रिकेटरच्या भूमिकेत?
- ‘मोदी ड्रामा बंद करो’; नाना पटोलेंचा पंतप्रधानांवर निशाणा
- वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; पाकिस्तानशी होणार पुन्हा सामना!
- अभिनेत्री मेहक चहलला मिळत नाही ‘वर’ म्हणाली, “मी अरेंज मॅरेजसाठी…”
- ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<