पैठणकरांनो सावधान ! विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट ; २ पॉझिटीव्ह

औरंगाबाद : शहरासोबतच आता ग्रामीण भागात देखील विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची टेस्ट करण्याचे सत्र सुरु झाले आहे. यातच शुक्रवारी सकाळी आरोग्य विभाग तसेच पोलिस अधिकारी यांनी विनाकारण फिरणाऱ्या २० जणांची टेस्ट केली, त्यामध्ये २ जण कोराना पाॅझिटीव्ह निघाले आहेत.

गुरुवारी महानगर पालिकेचे आयुक्त तसेच आरोग्य विभाग, पोलिसांच्या उपस्थितीत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोराेना टेस्ट करण्याचे आदेश दिले होते. त्याच धर्तीवर ग्रामीण भागामध्ये देखील विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चोप बसावा तसेच महाराष्ट्रामध्ये संचारबंदीची घोषणा दोन दिवसांपुर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. औरंगाबाद शहरासह जिल्हाभरात कोराेनाचे रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तपासणी, आयसोलेशन, उपचार, ऑक्सीजनचा तुटवडा पडत आहेत. तर जिल्हाभरामध्ये देखील रेमडेसिविर, लसीकरणच्या डोसचा देखील तुटवडा होत आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासन तसेच महानगर पालिकेने देखील विनाकारण फिरणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता यावे म्हणुन ही नामी युक्ती करण्याचे ठरवले आहे. यावर आता ग्रामीण भागामध्ये देथील विनाकारण तसेच खोटे कारणे सांगुन फिरणारे नागरिक देखील यामुळे आता घाराच्या बाहेर पडताना विचार करुन पडावे लागणार आहे. कोराेनाची टेस्ट या वेळी करण्यात येणार आहे. तर कोराेना पॉझिटीव्ह निघालेल्या रुग्णांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात येणार आहे. तर त्यामुळे पैठणकरांनो विनाकारण जर घराच्या बाहेर पडाल तर कोराना चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या      

IMP