पैठणमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी

औरंगाबाद :  जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून लॉकडाऊन काळात उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दि.१६ न.प.मुख्याधिकारी सोमनाथ जाधव व पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाNया नागरिकांची कोरोना रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली.

यावेळी मास्क न वापरणाNया लोकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाNयांवर मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी व त्यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी ५० जणांची अँटीजन तपासणी करण्यात आली. तसेच १०० वाहनांधारकांवर व विनामास्क १२५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

हि कारवाई न.प.चे अव्वल कारकुन व्यांक्टी पापुलवार, मुकुंद महाजन, अश्विन गोजरे, किशोर लांडगे, बाबासाहेब बर्पेâ, प्रितेश घोडके, गणेश सानप यांच्या पथकाने केली. तसेच या प्रसंगी नगरसेवक ईश्वर दगडे, कृष्णा मापारी, इरफान बागवान, सोमनाथ परळकर, बजरंग लिंबोरे, ज्ञानेश घोडके यांची उपस्थीती होती.

महत्त्वाच्या बातम्या