विनाकारण फिरणाऱ्या ६५ नागरिकांची कोरोना तपासणी, २ पॉझिटिव्ह!

औरंगाबाद : शहरात लॉकडाऊन काळातही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पकडून अँटिजेन तपासणी करत आहेत. नियुक्त पथकांनी शुक्रवारी (दि. १४) दिवसभरात ६५ जणांची कोरोना चाचणी केली. त्यातून दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहरात दररोज दिड हजारांच्या घरात कोरोना रुग्ण निघत आहेत. शहरातील अनेक भाग हॉटस्पॉट म्हणून जाहिर केले आहेत. राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात १४ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीतही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी होती. कुठलेही योग्य कारण नसतांना संचारबंदीतही अनेक जण रस्त्यावर फिरतांना दिसून आले. त्यामुळे आता नाहक फिरणाऱ्यांवर चोप बसावा यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील चौकाचौकांमध्ये बेजबाबदारांना पकडून मोबाईल व्हॅनमध्ये कोरोना तपासणी करण्यात येत आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आता मोबाईल व्हॅनची नजर असणार आहे. मनपा आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बेजबाबदार नागरिकांविरोधात हे पाऊल उचलण्यात आले आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विशाल पट्टेकर, स्मार्ट सिटीचे सिद्धार्थ बनसोडे, आरोग्य कर्मचारी, लॅब टेक्निशियन राबवित आहेत. शुक्रवारी दिवसभरात ६५ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यात कोणीही २ जण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP