पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढत असल्याने राज्यातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्याच सोबत राज्यातील अनेक नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पुण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतला आहे. पुण्यात आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबई नंतर पुण्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण सर्वाधिक आढळत असून पुणेकरांनी देखील आता काळजी घेणे आवश्यक असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच आता पुण्यातील शाळा पहिली ते आठवी पर्यंतच्या बंद करणार असून नववी आणि दहावीच्या शाळा मात्र सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. पुणे जिल्ह्यात ७४ टक्के लोकाचं लसीकरण झालं आहे. राहिलेल्या नागरिकांनी लवकर लस घ्यावी, असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, बुधवार पासून पुण्यात कडक नियम करण्यात येणार आहेत. तोंडाला मास्क असणे आवश्यक आहे. ज्यांच्या तोंडाला मास्क नसेल त्यांच्याकडून ५०० रुपये दंड आकरण्यात येईल तसेच जे लोक रस्त्यावर थुंकतील त्यांच्याकडून १००० रुपये दंड आकरण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील शाळा देखील बंद
- अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदय विकाराचा झटका, रुग्णालयात दाखल
- ‘…त्यामुळे दरेकरांवर फौजदारी संहितेनुसार कारवाई करा’; नवाब मलिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- “सरकारच्या हाताला नव्हे तर…”; शरद पवारांच्या वक्तव्याची आठवण करुन देत चंद्रकांत पाटलांची टीका
- औरंगाबादेत पाणीपुरवठा वाढवण्याच्या घोषणेचा पालकमंत्र्यांना विसर; पालिकेकडून केराची टोपली..!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<