धक्कादायक : भाजपा आमदारासह कुटुंबातील आणखी 6 जणांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

bjp

उस्मानाबाद- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. उस्मानाबादेतील भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकुर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातील सहाजण कोरोनाबाधित झाले आहेत.काही दिवसांपूर्वी आमदार ठाकूर यांच्या आई आजारी असल्याने कुटुंबातील सर्वांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली होती.त्यात ठाकूर यांच्या कुटुंबातील सहा जणांचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.

आमदार ठाकूर यांच्यासह सर्व कुटुंबीयांची प्रकृती चांगली असल्याची माहिती ठाकूर यांनी सोशल मीडियाद्वारे प्रसारित केली आहे. सोशल मिडीयावर त्यांनी लिहले आहे की, ‘मी 3 ऑस्टपासून कुणाच्याही संपर्कात आलेलो नाही. मंगळवारी 4 ऑगस्टला कुटुंबातील सर्वांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. त्यानंतर कुटुंबातील 6 सदस्यांचे रिपोर्ट सकारात्मक आले आहे.

संपर्कात आलेल्या इतरांची ही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे अहवाल हे प्रतीक्षेत आहे. माझ्यासह कुटुंबातील सर्वांची प्रकृती ही चांगली आहे. आपणही आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी’ असे आवाहन सुजितसिंह ठाकुर यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

दिलासादायक: तब्बल १५ लाख रुग्णांनी गेले कोरोनाला चितपट!