#corona : क्वारंटाइन केलेले लोक रात्री आपापल्या घरी जाऊन झोपतात : खा. विखे पाटील

sujay vikhe patil

अहमदनगर : जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या तीन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित १६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून आलेल्या १९ व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७५ इतकी झाली असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.

एका बाजूला नगरमध्ये कोरोनाग्रस्त लोकांची संख्या वाढत आहेत तर दुसऱ्या बाजूला लोकं नियमांचे सरसकट उल्लंघन करत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला घाबरू नका, त्याच्यासोबत जगायला शिका असा सल्ला देताना नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यंत्रणेतील मर्यादाही बोलावून दाखविल्या. क्वारंटाइन केलेले लोक नावालाच क्वारंटाइन असून ते रात्री आपापल्या घरी जाऊन झोपतात, असे विधानही त्यांनी केलं.

चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी ‘व्हॉट्सअपने’ उचललं हे पाऊलं

महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. विखे म्हणाले, गर्दी आणि संपर्क टाळणे हाच करोनाची लागण रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. त्याच दृष्टिकोनातून देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यामुळंच एखाद्याला करोनाची लक्षणे दिसल्यास त्याला तात्काळ क्वारंटाइन केले जाते. साधारण १४ दिवस त्यानं इतरांपासून वेगळं राहावं हा उद्देश त्यामागे असतो. ग्रामीण भागात अशा प्रकारे अनेकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. पुण्या-मुंबईतून आलेल्यांनाही गावाबाहेरच्या शाळेत किंवा समाज मंदिरात ठेवलं जात आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या या नियमांचं पालन होत नसल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. सुजय विखे यांनी हीच गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

राहुल गांधींचे ते वक्तव्य योग्यच, महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार नाही, तर…

परीक्षांचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?; राज ठाकरे यांचं राज्यपालांना खरमरीत पत्र