लातूर: कोरोना प्रतिबंधक व बहुचर्चित कोविशिल्ड लस बुधवारी सायंकाळी लातुरात दाखल झाली. लातूर आरोग्य परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या लातूरसह चार जिल्ह्यांसाठी आलेल्या 66 हजार लसीचा साठा आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी ताब्यात घेतला.
त्यानंतर ही लस जिल्ह्यांसाठी रवाना करण्यात आली. लसीच्या उपलब्धतेमुळे आरोग्य विभागाने शनिवारपासून जिल्ह्यातील आठ केंद्रावर प्रायोगिक तत्वावर दररोज शंभर लसीकरणाची तयारी केली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्करची निवड करण्यात आली आहे. त्यात सरकारी व खासगी रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांसह कोरोना रूग्णांच्या समोर जाऊन तसेच शेवटच्या पातळीवर जाऊन काम करणाऱ्या आरोग्य व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकांनाही लस देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- थोरातांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल सर्व राज्यांसाठी उपयुक्त; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
- ‘माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी बाबासाहेबांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार’
- नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ परिसरात रोषणाई
- डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता ‘या’ पदाचा कार्यभार सांभाळणार
- ‘सीता प्रत्येक युगात अग्निपरीक्षा देणार नाही’-करुणा मुंडे